Sunday, December 29, 2024

/

गोमटेश शेडाचा वाद पेटला अन गुंजटकरांचा आवाज दाबला – सभागृह चूपचाप

 belgaum

Corporation meetingमहापौर संज्योत बांदेकर यांच्या कारकिर्दीतील पहिली मासिक सर्वसाधारण सभा गाजली ती वादग्रस्त असलेल्या गोमटेश विद्यापीठ  शेड हटविण्याच्या मुद्द्यामुळे .. रस्त्यात बेकायदेशीर असलेले गोमटेश विद्यापीठाचे शेड हटवावे अन्यथा मी धरणे आंदोलन करणार अशी मागणी नगरसेवक आणि बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष विनायक गुंजटकर यांनी केल्याने काही सभागृहात गोंधळ माजला आमदार द्व्यांची पुरेपूर झाली मात्र शेवटी बेकायदेशीर शेड हटविण्यासाठी पुढ सरसावलेल्या गुंजटकरांचा आवाज हा मुद्दा न्याय प्रविष्ट असल्याचे कारण दाखवून दाबला गेला.

पालिकेत सभागृहात गुंजटकर यांनी रस्त्यावर असलेल शेड हटविण्याची मागणी करताच भावना विवश झालेले ग्रामीणचे आमदार संजय पाटील उठले आणि आपल्या संस्थेला सदर जागा कुलकर्णी नावच्या व्यक्ती कडून आम्ही जागा खरेदी केली असून पालिके कडून रीतसर परवानगी घेऊन बांधण्यात आली आहे अस स्पष्टीकरण देत गोमटेश चे शेड हटविले जाईल मात्र अगोदर शहरातील अनेक बेकायदेशीर बांधकाम आहेत ती हटवा मगच गोमटेश कडे मोर्चा वळवा अशी मागणी करत दहा मिनिटाहून अधिक काळ सभागृहाला संबोधन केल.

यावेळी बोलताना आमदार संभाजी पाटील म्हणाले की शहरात सी डी प्लन कायम राहत नाही तो सतत बदलत असतो त्यामुळे गोमटेश शेड चा मुद्दान्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे यावरच चर्चा करण्यात येऊ नये असा सल्ला दिला. विशेष म्हणजे पालिकेच्या बैठकीस कधीच उपस्थिती न लावणारे ग्रामीण आमदार संजय पाटील हे आपल्या गोमटेश शेड चा मुद्दा चर्चेत येणार असल्याची कुणकुण लागताच मुद्दाम हून हजार होते .

फिरोज यांचा चढला पारा

संजय पाटील यांनी आपल्या अनधिकृत बांधकाम पाडावण्यापेक्षा गांधी नगर येथील नवीन भाजी मार्केट बांधकाम आधी बंद करा अशी मागणी करताच आमदार फिरोज सेठ यानाचा पारा चढला आणि त्यांनी काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडफेक करू नये असा टोला विनायक गुंजटकर यांना लगावला. बेळगाव शहरात सगळीकडे अनधिकृत बांधकाम आहेत अनेक गरिबांना आपल्या कष्टातून घर बांधली आहेत त्यांची घर तुम्ही पाडवणार का ?असा प्रश्न उपस्थित करून आमदार संजय पाटील यांच्या गोमटेश विध्यापिठा बेकायदेशीर शेडाची बाजू सावरली . आमदार संजय पाटील यांची गोमटेश शिक्षणसंस्था  अल्पसंख्यांकांची  आणि गरिबांची आहे पालिके कडून अल्पसंख्याकांनी कोणतीच मदत मिळाली नाही पालिकेनी काहीही दिलेलं नाही अश्या संस्थेस पालिकेन मदत करावी आणि महापौरांनी या विषयावर कोणताच रुलिंग देऊ नये अशी मागणी केली .

स्थायी समिती अध्यक्ष पदाची काहीच किंमत नाही – गुंजटकर

गोमटेश वादात पहिला पासून आक्रमक राहिलेले नगरसेवक आणि सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष विनायक गुंजटकर यांनी  गोमटेश  वादावर तिन्ही आमदार एकत्र आले असल्याने सभागृहात आमच्या पदाची किंमत उरली नसून या पदात ताकत नाही आहे अशी प्रतिक्रिया बेळगाव live शी बोलताना दिली आहे.

अनगोळ मधील शिव शक्ती नगर भागात एका सामान्य महिलेच भंगी बोळातील रस्त्यात अतिक्रमण केल आहे म्हणून पालिका बुल्डोझर लाऊन घर पाडवते पण एका लोक प्रतिनिधी ने शिक्षण संस्थेसाठी रस्त्यात आलेलं शेड हटविल जात नाही का कुठला न्याय आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे .

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.