बस स्थानकात जनजागृती-मराठी शाळा वाचवाकर्नाटकातील मराठी टक्का वाढवण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेतला आहे,प्रत्येक रविवारी दिसेल त्या लहान मुलांच्या पालकांची याबाबत जनजागृती करण्याचे काम या युवकांनी सुरु केले असून त्यांच्या या कार्याचे कौतुक सीमाभागात होत आहे.
बेळगावातील मराठी शाळा वाचाव्यात आणि त्यांची पटसंख्या वाढावी म्हणून बेळगाव मधील तरुण आता रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसंपासून सीमाभागातील मराठी शाळा बंद करण्याचा घाट कानडी प्रशासनाकडून घातला जात होता. याला सीमाभागातील मराठी बांधवांनी तीव्र विरोध केला होता. आज बेळगाव जिल्ह्यातील तरुणांनी सीमाभागातील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थिला तरुणांनी गुलाब पुष्प देण्यात आलं. तसच पालकांशी देखील तरुणांनी यावेळी चर्चा केली. तिसऱ्या रविवारी मराठी शाळा साठी सुरु मोहिमेत विजय निंबाळकर, सतीश गावडोजी,मेघन लंगरकांडे आदी उपस्थित होते
Trending Now