राज्य महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कुवेम्पू नगर येथील घरासमोर जादूटोणा मंत्र केलेल्या वस्तु पडत आहेत. गुरुवारी सकाळी त्यांच्या घरासमोर लावलेल्या कार खाली लिंबु आणि इतर वस्तू सापडल्या आहेत.
2013 च्या विधानसभा निवडणुकी नंतर हेब्बाळकर यांच्या घरा समोर सतत लिंबू, कार खाली कुंकू लावलेला नारळ, मिरच्या, आदी वस्तू पडत आहेत. अमावस्या आणि पौर्णिमेला या वस्तू पडण्याचे प्रमाण अधिक आहे अशी माहिती बेळगाव live कडे उपलब्ध झाली आहे.
हेब्बाळकर यांच्या राजकीय विरोधका कडून असले प्रकार केले जात असतील असा संशय व्यक्त केला जात आहे.
मी जादूटोणा करणी वर विश्वास ठेवत नाही मात्र अश्या गोष्टी घरासमोर पडत असल्याने मानसिक खच्चीकरण होत आहे.या करणी मूळ अनेक घटना घडल्या आहेत अस हेब्बाळकर यांनी म्हटलं आहे माझ्या आणि बंधू चरणराज यांच्या कार खाली अश्या वस्तू पडल्याने कार चा अपघात देखील झाला होता लोक हे कशयासाठी करतात असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.