कर्नाटकात का नाही झळकणार बाहुबली -2
- कटप्पा ने बाहुबली ला का मारले ? या प्रश्नाच उत्तर देणार बाहुबली पार्ट 2 हा चित्रपट कर्नाटकात 28 एप्रिल रोजी रिलीज होणार नाही आहे.
तामिळ कलाकार सत्यराज यांनी कावेरी पाणीवाद आंदोलनावेळी कन्नडीगांचा अपमान केला होता त्यामुळे कन्नड नेते वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वात कन्नड संघटनांनी यांनी 28 एप्रिल रोजी बंगळुरू बंद ची हाक दिली आहे.
तामिळ अभिनेते सत्यराज यांनी बिनशर्त माफी मागावी अशी अट काही कन्नड संघटनांनी घातली आहे. सत्यराज हे बाहुबली पार्ट 2 या चित्रपटात भूमिकेत आहेत सत्यराज यांनी कावेरी वादात घेतलेलं वक्तव्य मागे घ्यावं अशी देखील मागणी कन्नड संघटना करत आहेत. जर का सत्यराज यांनी माफी मागितली नाही तरी चित्रपट रिलीज झाला तरी आंदोलन चालूच राहील अशी भूमिका देखील कन्नड संघटनांनी मांडली आहे.