माजी आमदार अभय पाटील यांच्यावर गुरुवारी ए सी बी पोलीस पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
भ्रष्टाचार निर्मुलन परिवाराचे अध्यक्ष सुजित मूळगुंद यांनी लोकायुक्त कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई झाली आहे. ७ दिवसात तपास करून अहवाल सादर करा असे आदेश न्यायालयाने ए सी बी ला दिले होते. या प्रकरणी थोडा वेळ मागून अभय पाटील यांच्यावर गुन्हा क्र ७/२००७ द्वारे कारवाई करण्यात आली आहे.
एका राजकारण्याच्या भ्रष्ट कारभारावर झालेली ही मोठी कारवाई आहे, संपूर्ण कर्नाटकात हे एक दुर्मिळ प्रकरण असून पुढील आमदारकीच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे.
Trending Now