मास्टर प्लॅन मोहीम राबवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अधिकारी असोत किंवा विस्थापित असोत किंवा त्या भागातील लोक प्रतिनिधी असोत प्रत्येकाची ती जबाबदारी असतेच .हीच जबाबदारी पेलताना प्रभाग क्रमांक 33 चे नगरसेवक बाबूलाल मुजावर यांनी सगळ्यासमोर एक आदर्श उदाहरण समोर ठेवलंय.
मास्टर प्लॅन मोहीम राबवतेवेळी
त्यांच्या समाजातील काही व्यापारी दुकान तोडण्यास विरोध करत होते अश्या स्थितीत दुसरी बाजू पाडवली असताना सगळ्यांना एकच न्याय म्हणत दुकान पाडवण्यास विरोध करणाऱ्या आपल्या लोकांना धुडकावत दुसऱ्या गटातील युवकांना सोबत घेऊन मास्टर प्लॅन मोहीम पूर्ण केली .हे करत असतेवेळी ते बुलडोझर सोबत आघाडीवर होते . आपला जीव धोक्यात ठेऊन हे काम करत होते बुलडोझर ने इमारत पाडवतेवेळी शटर चे रॉड कोसळून देवा नावाचा एक राजस्थानी युवक जखमी झाला या युवकाच्या हाताला इजा पोचली आहे त्याच्या बाजूला थांबलेले बाबूलाल मुजावर हे केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठ्या अपघातातून बचावले आहेत शटर ची रॉड त्यांच्या छातील बसली असती .आपला जीव धोक्यात ठेऊन समाजासाठी काम करणारे नगरसेवक कमीच आहेत अश्या पैकी एक असलेल्या बाबूलाल मुजावर यांचं कार्य कौंतूकास्पद आहे