शिवाजी महाराजावर निस्सीम भक्ती ठेऊन आपण कस शिवाजी महाराज दिसू .. कशी आपली दाढि शिवाजी महाराजा सारखी दिसेल असा विचार करून तशीच वेशभूषा करणारे युवक शहरात भरपूर दिसतात .पेशाने ऑटो चालक असेलला सचिन बसरीकट्टी देखील असाच एक युवक आहे की ज्याने शिवाजी महाराजांची भूमिका गेली १४ वर्ष शिव जयंती मिरवणुकीत पार पाडली आहे.
मेणशी गल्लीत राहणारे ३५ वर्षीय सचिन ऑटो चालवतात त्यांची दाढि आणि कपाळावरील अर्ध चंद्र हे विशेष आहे .मेणशी गल्लीतील शिव जयंती मंडळाचे ते सध्या अध्यक्ष आहेत. सचिन यांनी बेळगाव live शी बोलताना आपली भावना व्यक्त केली की फक्त मेणशी गल्लीत नाही तर कडोलकर गल्ली, विष्णू गल्ली येथील मंडळांसाठि देखील त्यांनी शिवरायांची भूमिका साकारली आहे . गेली ६८ वर्ष आमची गल्ली शीवजयंती उत्सव साजरी करत असून आम्ही पण डॉल्बी मुक्त शिव जयंती करत आहोत फक्त ऐतिहासिक हलते देखावे कसे सादर करता येतील यावर आमचा भर असतो शिवा काशीद चे बलिदान हा देखावा आम्ही यावर्षी सादर करणार असून १७ पात्रे यात आहेत आमच्या चित्र रथा समोर लाठी मेळावा हे आमचे वैशिष्ठ्य आहे .