लष्करातील स्टोअर चे सामान आणण्यासाठी कोटा(राजस्थान) हुन भाटिणदा(पंजाब) ला जाणाऱ्या एका जवानाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. दीपक कुमार अस या जवानाच नाव असून तो आपल्या साथी जवानाच्या सोबत शुक्रवारी सकाळी कोटा हुन भाटिण्ड ला रवाना झाला होता. शुक्रवारी रात्री रतनगड जवळील पडीहरा गावाच्या बस स्थानका जवळ विश्रांती साठी थांबले असता शनिवारी सकाळी सोबतच्या जवानांनी उठवण्याचा प्रयत्न केला असता तो मृत अवस्थेत आढळला . जयपूरला अंबुलन्स मधून त्याच पार्थिव पोचवलं जाणार असून त्यानंतर सेनेच्या खास हेलिकॉप्टर हुन जयपूर हुन बेळगाव ला पार्थिव आणण्यात येणार आहे.राजस्थान चे देवस्थान राज्य मंत्री राजकुमार रिनवा यांनी मृतक जवानास श्रद्धांजली वाहिली. मृतक जवानाची पत्नी आणि 5 वर्षाचा मुलगा कोटा येथे रहातात.या घटनेची जवानाच्या नातेवाईकाना कल्पना देण्यात आली असून बेळगाव जिल्ह्यातील तो कोणत्या गावचा आहे हे समजलं नाही आहे.
Trending Now