चव्हाट गल्लीतील शिवजयंती उत्सव मंडळ शहरातील जुन्या मंडळापैकी एक असून गेल्या ८२ वर्षापूर्वी पासून या गल्लीत शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो.प्रत्येक सणात व्यसन करून धाड धिंगाणा घालण्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळतात मात्र गेल्या दहा वर्षापासून व्यसनमुक्त आणि डॉल्बी मुक्त शिव जयंती उत्सव करून या गल्लीने बेळगाव शहरासमोर एक आदर्श उभा केला आहे .
शिव जयंती उत्सव मंडळ चवाट गल्ली चे सचिव रोहन जाधव यांनी बेळगाव live ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ‘लोकमान्य संस्थेच्या वतीने आयोजित उत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार गेल्या दहा वर्षात सलग सहा वर्ष प्रथम क्रमांक तर मध्यवर्ती शिवजयंती चा सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळविला आहे . आम्ही डॉल्बी लावण्यास फाटा दिला असून सजीव देखावे दाखवण्यावर आमचा भर असतो .
शिव काळात महाराजांचा न्याय निवडा कसा होता महिलांचा आदर कसा राखला जायचा स्वराज्यात इतर धर्मीय विशेषता मुस्लीम मावळे सुद्धा कार्यरत होते यावर आधारित चित्ररथ आम्ही यावर्षी तयार केला असून यात ५५ ते ६० कलाकार असणार आहेत वेळेत चित्ररथ सुरु करण्यात आमचा भर असतो अशी माहिती जाधव यांनी दिली आहे .
बेळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच शिव जयंती दिवशी महाप्रसादाचे आयोजन केलं असून २८ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेस आम्ही या शिव प्रसादाचे वितरण करणार आहोत. कमीत कमी २० हजार लोक याचा स्वाद घेतील असा आमचा अंदाज आहे बेळगावातील शिव प्रेमींनी देखील शिव प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील शिव जयंती मंडळाने केले आहे .