बसवेश्वर जयंतीची सुट्टी रद्द करा-अंगडीजगद्गुरू बसवेश्वरांनी मनुष्याच्या शरीरात असलेला आळस पणा दूर करून सतत मेहनती बनण्यासाठी काय कवे कैलास श्रम हाच धर्म असा संदेश दिला होता. अश्या महान पुरुषाच्या जयंती दिवशी सरकारी सुट्टी रद्द झाली पाहिजे त्या दिवशी जास्त काम केलं पाहिजेत अस मत खासदार अंगडी यांनी व्यक्त केलं आहे.
गोवा वेस येथील बसवेश्वर चौकात बसवेश्वर पुतळ्यास पुष्प अर्पण करून बसव जयंती ची सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी बोलताना पालकमंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले की बसवेश्वर महाराज एका समाजा पुरता मर्यादित नसुन त्यांनी दिलेला संदेश तत्व वचन आणि शिकवण सगळ्या समाजाना लागू पडतात. आज देखील समाजात समानता आणि क्रांती न्याय आणण्यासाठी बसव जयंती चा आयोजन झालं पाहिजेत.
आमदार संभाजी पाटील, संजय पाटील, महापौर संज्योत बांदेकर,जिल्हाधिकारी एन जयराम, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी बसवेश्वर प्रतिमेस हार अर्पण केले
Trending Now