कट्टप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचा उलगडा करणारा बाहुबली २ येत्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सर्वात महागडा म्हणून गणले जाणाऱ्या या चित्रपटाचे तिकीटही तितकेच महाग असणार आहे.
आत्तापासूनच बुकिंगला गर्दी होत आहे. सद्या या चित्रपटासाठी १८० ते २५० रुपये आकारले जात आहेत, सिंगल स्क्रीन असलेल्या ठिकाणी ऍडव्हान्स बुकिंग साठी १२० ते १५० रुपये घेतले जात आहेत.
आयनॉक्स सध्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी १८० -१५० असा दर आकारत आहे. ग्लोब, हिरा आणि प्रकाश मध्ये १२०- १५० असा दर आहे. तरीही आत्ताच पहिले दोन आठवडे हाऊसफुल्ल होण्याच्या मार्गावर आहेत.
Trending Now