Monday, December 30, 2024

/

बलात्कार प्रकरणी पाचव्या आरोपीला अटक एम टेक चा विध्यार्थी

 belgaum

बेळगाव दि ०१:प्रियकरा सोबत फिरायला गेलेल्या महाविध्यालयीन युवतीवर सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार संशयिताना काकती पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी पाचव्या आरोपीला काकती पोलिसांनी अटक केली असून तो एम टेक चा विध्यार्थी आहे.सोमशेखर शहापूर (वय २३ मुळ चा बैलहोंगल सध्या अनगोळ ) असे त्याचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सदर पिडीत युवती आपल्या प्रियकरा सोबत भूतरामहट्टी गार्डन जवळील मोठ्या पंख्यां कडे गेले असता सात जणांनी बाजूला नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता सगळी गेल्या १५ फेब्रुवारी सायंकाळी सात च्या सुमारास ही घटना घडली होती बलात्कार करणाऱ्यांनी पंधरा मिनिटे चित्रीकरण करून पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न नराधमांनी केला होता अशी सगळी माहिती माहिती पोलिसांनी प्रियकरा कडून तपासात उघड केली आहे . त्यानंतर पिडीत युवतीने आपल्या पालकांच्या उपस्थितीत काकती पोलिसात तक्रार दाखल केली आहे . मागच्या मंगळवारी  सायंकाळी पर्यंत पोलिसांनी सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार संशयितांना अटक केली होती. सदर संशयित हे मुत्त्यानट्टी गावचे रहिवाशी असल्याची माहिती मिळाली होती. मंगळवार सायंकाळी पर्यंत संशयित आरोपींची चौकशी सुरूच होती . पाचवा आरोपी अनगोळ येथील आहेrape logo

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.