चंदगड दि ११- इनाम म्हाळुंगे येथील रणजित गावडे या जवानाने मी कोण?
या सदराखाली आपली ओळख आणि इच्छा चंदगडवासीयांना डिजिटल फलका द्वारे करून दिली आहे. म्हाळुंग्याचा स्वाभिमानी सैनिक लान्स नायक हवालदार रणजित गावडे याचे मनोगत मांडले असून चंदगड तालुक्यात हा एक चर्चेचा विषय बनला आहे . गेल्या सहा महिन्यात चंदगड तालुक्यातील दोन जवान सीमेवर लढताना शहीद झाले होते .
सोलापूर भाजप आमदार प्रशांत परिचारिक यांनी नुकताच विधान परिषदेतून निलंबित करण्यात आल होत सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पत्नी विरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवल होत याचा राग या म्हाळुंगे येथील जवानाने काढला आहे.
मी कोण? त्यावेळी पण मीच होतो. आत्ता पण मीच आहे.
मी ज्या वेळी लष्करात भरती झालो त्याच वेळी मी शपथ घेतली होती,की मी देश रक्षणासाठी सीमेवर जात आहे, त्या ठिकाणी जर का मला शत्रूशी लढता लढता वीरमरण आले तर माझे पार्थिव माझ्या कुटूंबियांच्या आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त भष्ट राजकारण्यांच्या हाती चुकूनही देऊ नये असे मनोगत लान्स नायक रणजित गावडे यांनी व्यक्त केले होते