Tuesday, December 24, 2024

/

पीओपी च्या समर्थनात झाला मोर्चा

 belgaum

बेळगाव दि 7: पीओपी च्या समर्थनात झाला मोर्चाशहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गणेश भक्त आणि मूर्तिकारांनी मंगळवारी भव्य मोर्चा काढला. प्रशासनाने पीओपी वरील बंदी उठवावी अशी मागणी मांडण्यात आली. सहाय्यक जिल्हाधिकारी सुरेश इटनाBल यांनी निवेदन स्वीकारले.आमदार संभाजी पाटील, संजय पाटील, माजी आमदार अभय पाटील यांनी मोर्चाचे नियोजन केले होते.
शिवाजी उद्यानातील महाराजांच्या मूर्तीचे पूजन आमदार संभाजी पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर माजी उपमहापौर संजय शिंदे यांनी गणेशाचे पूजन केले. एस पी एम रोड, नवे ब्रिज, शनी मंदिर मार्ग, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कचेरी रोड आदि मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला होता.
माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, प्रकाश शिरोळकर, नेताजी जाधव आदी मंडळी सहभागी होती. ठीक ठिकाणी पाणी व फळे वाटण्यात आली. प्रशासनाने आपला निर्णय मागे न घेतल्यास पुन्हा मोरचा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.