बेळगावात माणुसकी आहे. माणुसकीने भारलेले कार्यकर्तेही आहेत. या साऱ्या कार्यकर्त्यांची भेट बेळगाव live च्या वाचकांना म्हणजेच नेटकरांना करून देण्याचे आम्ही ठरविले आहे. दर आठवड्या ला एका सामाजिक, राजकीय, आर्थिक,उद्योजक अश्या सामान्यातल्या सामान्य विविध क्षेत्रातील व्यक्तीची ओळख आम्ही करून देणार आहोत “आठवड्याचा माणूस” आम्ही समोर आणणार आहोत. यात पहिला क्रमांक लागतो तो बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांचा.
माजी महापौर ही त्यांची राजकीय ओळख. सामाजिक कार्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. अवघ्या तीन महिन्यात सीमाप्रश्नाचा ठराव मांडून महापौर पदाला लाथ मारलेले विजय मोरे कन्नडीगान्नि काळे फासल्याने जागतिक स्थरावर पोचले आज त्यांचे सामाजिक उपक्रम अनेकांसाठी आदर्श ठरले आहेत.
विजय पांडुरंग मोरे, एक शिक्षकाचा मुलगा, ज्युनिअर शिवाजी पार्क युवक मंडळाच्या कार्यातून सामाजिक जीवनात आला, त्यांनी आजवर तब्बल ७५० बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. शांताई वृद्धाश्रम या निराधार वृद्धांसाठी स्थापलेल्या संस्थेचे ते मागील १९ वर्षांपासून सक्रिय कार्याध्यक्ष आहेत. अथर्व मेडिकल फौंडेशन च्या माध्यमातून त्यांनी आजवर २५० हुन अधिक गरीब रुग्णांना मदत केली आहे, विद्या आधार योजनेतून रद्दी संकलित करून त्यांनी तब्बल ३५० विद्यार्थ्यांची १८ लाखांची फी भरून त्यांच्या शिक्षणाला आधार दिला आहे, माणुसकीची भिंत सुरु करुन मोरे ज्यांना जे नको आहे ते जमवून ज्यांना गरज आहे त्यांना पुरवताहेत. त्यांच्या कामांची यादी मोठी आहे, यामुळेच ते ग्रेट ठरतात.
एक रुग्णमित्र म्हणून ते परिचित आहेत. बेळगावचे सिव्हिल, केएलइ आणि इतर इस्पितळात एखादा रुग्ण अडला की ते धावून जातात. त्यांचा ९८४४२६८६८७ हा मोबाइल नंबर सगळ्यांना पाठ आहे आणि ते स्वतः एक चालती बोलती हेल्पलाईन आहेत.
ते हिंडलगा कारागृह समितीवर आहेत कैद्यांच्या मनपरीवर्तनासाठी ते झडतात. Hiv बाधितांसाठी ते कार्य करतात. वेश्यांना त्यांच्या चुकीच्या मार्गातून बाहेर काढण्यासाठी वेळ देतात. Kle विद्यापीठाच्या nss बोर्डावर ते आहेत. प्रत्येक बेलगावक राला अभिमान वाटावा असे त्यांचे कार्य आहे. त्यांना बेळगाव live चा सलाम. विजय मोरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.