बेळगाव दि 15-सीमेवर लढणाऱ्या जवानांना देशात सगळीकडे मान सन्मान दिला जातो हेच जवान लढताना शाहिद झाल्यास राजकारणी सलुट करतात मात्र बेळगावात सुट्टीवर आलेल्या जवानास ग्राम पंचायत सदस्य आणि अधिकाऱ्या कडून मानसिक त्रास दिला जात आहे .
आंबेवाडी ग्राम पंचायत पी डी ओ कडून जवानास नवीन घर बांधण्यास एन ओ सी देण्यास टाळाटाळ करून त्याची गळचेपी केली जात आहे .
परशराम मुंगारे असं या भारतीय सेनेतील जवानांच नाव असून तो सध्या श्रीनगर जम्मू येथे सेवा बजावत असून सुट्टीवर आला आहे . सध्या त्याला आंबेवाडी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात मध्ये नवीन घर बांधायचं आहे.घर बांधण्यासाठी बँकेतून कर्ज काढण्यास पंचायती तुन सर्व्हे नंबर मधील एन ओ सी देण्यास पी डी ओ टाळाटाळ करत आहे.देशाचं सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानास अश्या पद्धतीनं वागणूक देणाऱ्या पी डी ओ आणि आंबेवाडी ग्राम सदस्यांना जाब विचारणे गरजेचं आहे.