बेळगाव दि २८ – कळपातील माकडांनी एका माकडावर हल्ला करून त्याला किरकोळ जखमी केल्याने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चक्क एका घरचाच आश्रय घेतला .
हा प्रकार घडला आहे शहापूर जेड गल्लीतील मोहन देवाप्पा गावडोजी यांच्या घरात … मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास गावडोजी यांच्या घरात अचानक माकड घुसले आणि जिन्याकडे जाऊन बसले हाकलायला गेल्या वर बाहेर जाताच जाईना दुपारचे चार वाजले अनेकांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला तरी माकड काय या घरातून हालेना शेवटी याच गल्लीतील सामाजिक कार्यकर्ते सतीश गावडोजी यांनी हलगा बस्तवाड येथील सर्प मित्र रामा पाटील यांना पाचारण करण्यात आल्यावर पाटील यांनी माकडाला उचलून घराबाहेर गॅलरीत नेले आणि केळी फळ खायला घातली त्यानंतर गावडोजी परिवाराने घरातील माकड बाहेर गेल्यावर सुटकेचा निश्वास सोडला .