बेळगाव दि 7 : सीमा भागातील मराठी जनतेला केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने दिलेल्या कायद्या नुसार सरकारी कागद पत्र मराठीत ध्यावी अशी मागणी करत केंद्रीय अल्पसंख्यांक उपायुक्त एस शिवकुमार यांना निवेदन दिल आहे .
भारतीय घटनेनुसार अल्पसंख्यांकांना त्यांच्या भाषेतून सरकारी परिपत्रके, माहिती देण्याचा आदेश असूनही तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाच्या दि. १८ नोव्हेंबर २०१३ च्या आदेशानुसारही अद्याप येथील सरकारी कार्यालयातून मराठीतून माहिती, परिपत्रके इ. दिली जात नाहीत, तरी आपण याचा गांभीर्याने विचार करून मराठीतून माहिती देण्यास भाग पाडावे, अशा मागण्यांचे निवेदन मध्यवर्ती एकीकरण समिती, मराठी भाषिक युवा आघाडी , महीला आघाडी, मराठी युवा मंच, तालुका समिती आम्ही आपणास देत आहोत, असे सांगत मराठी भाषिकांच्या सर्व अडचणींचा अवगत करुन दिल्या.