बेळगाव :- ता. २३ देशाला स्वातंत्र मिळविण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याच्यातीलच शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी दिली गेली,
ब्रिटिश अधिकारी सँडर्स चा खून केल्याचा आरोप ठेऊन या तीन शहिदाना फाशी दिली. त्या शहिदांचा आज ८६ वा स्मृतिदिन स्टेशन रोड येथील शहीद भगतसिंग चौकात केला.
बेळगावातील जेष्ठ स्वातंत्रसैनिक विठ्ठलराव याळगी, राजेंद्र कलघटगी, परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, माजी महापौर सरिता पाटील, प्रभागाच्या नगरसेविका माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, यांनी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली, शहीद भगतसिंग फौंडेशन च्या वतीने परमिदंर सिंग यांनी आदरांजली वाहिली,
जेष्ठ स्वातंत्रसैनिक विठ्ठलराव याळगी यांनी कोणत्या कारणाने त्याना फाशी दिली गेली ते सांगितले,
परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, माजी महापौर सरिता पाटील, नगरसेविका व माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महादेव पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन या भागातील कार्यकर्ते विजय होनगेकर,विशाल गौडाडकर, रोहन जाधव, किशोर मराठे, विजय मुतकेकर, यांनी केले.
यावेळी रणजित चव्हाण-पाटील, प्रकाश मरगाळे, नारायण किटवाडकर, अशोक हलगेकर,महेश मुतकेकर, विकास कलघटगी, मदन बामणे, राजू मरवे, पांडुरंग पालेकर, गुणवंत पाटील, सुनील जाधव सूरज कणबरकर, व नागरिक आणि रिक्षा चालक मोठया संख्येने उपस्थित होते,