बेळगाव दि ११- कस्तुरी रंगन अहवालात असलेल्या त्रुटी दूर करून खानापूर तालुक्यातील ६२ गावावर एको सेन्सिटीव झोन सामील केल्याच्या विरोधात खानापुरात शनिवारी आंदोलन करण्यात आल . खानापूर आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वात खानापूर गोवा रोड शिव स्मारकाजवळ तब्बल एक तास रस्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला .
कस्तुरी रंगन अहवालाच्या शिफारसी नुसार खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील ६२ गावांचा एको सेन्सिटीव झोन म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे या नुसार या ६२ गावांना स्थलांतरित करण्यात येणार असून या गावातून बांधकाम परवानगी विकास काम सुविधा बंदी करण्यात येणार आहे याचा विरोध करत शेकडो ग्रामस्थांनी आंदोलन केल . या गावातील लोकांना सुविधे पासून वंचित रहाव लागणार आहे हा खानापूर तालुक्यावर केलेला अन्याय आहे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर वन मंत्री असताना आम्ही अनेकदा निवेदन दिली आहे केंद्राला अनेकदा शिष्ट मंडळ घेऊन मागणी केली तरी याकडे दुर्लक्ष केल गेल आहे म्हणून आम्ही आज एक तास ठिय्या आंदोलन करत आहोत अशी माहिती आमदार अरविंद पाटील यांनी दिली