बेळगाव दि ११- संसारातील दररोजच्या जीवनातील सुख दुख विसरून खास करून महिला आणि बालकासाठी वूमनिया होळी आयोजित केली असल्याची माहिती राज्य महिला कॉग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे.
बेळगावातील सी पी एड मैदानात सोमवारी या वूमानिया होळी कार्यक्रमाची तयारी बाबत पत्रकारांना माहिती सांगत होत्या . गेली ३ वर्ष महिला कॉंग्रेस अध्यक्षा महिला साठी होळी कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. या वूमनिया होळी कार्यक्रमात अनेक प्रकारचे गीत संगीत नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
उतर प्रदेश आणि उत्ताराखंड मध्ये भाजपाच्या विजया बाबत बोलताना हेब्बाळकर म्हणाल्या कि फक्त उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्येच का ? गोवा पंजाब आणि मणिपूर काम कमळ खिलल नाही अशी त्या म्हणाल्या .