बेळगाव दि १ : बेळगाव शहरावरून धावणारी पहिली जलद ए सी ट्रेन हमसफर एक्स्प्रेसचे बेळगाव रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आल. १४७१६ तिरुचीपल्ली ते श्री गंगानगर सकाळी दहा वाजता रेल्वे स्थानकावर आगमन झाल.
स्वागत करतेवेळी सिनियर डी सी एम राजप्पा, स्टेशन मास्टर सुरेश, ट्राफिक मनेजर सेलवन ,कमर्शियल मनेजर गुप्ता, चेंबर माजी अध्यक्ष सतीश तेंडोलकर, कन्नुभाई ठक्कर आदी उपस्थित होते
या गाडीत प्रवाश्या करिता या गाडीत जी पी एस सिस्टम सह अनेक खास सुविधा देण्यात आल्या आहेत तसच प्रत्येक बुगीत एल इ डी बसविली असून धुम्रपान आणि आग रोखण्यासाठी सेन्सर देखील बसविलेली आहेत . बायो प्रसाधन गृह आणि चहा कॉफी देण्यासाठी वेंडिंग मशीन आधुनिक पद्धतीची कचरा कुंड या हमसफर गाडीची वैशिठ्ये आहेत. बेळगाव हून राजस्थान गुजरात आणि मुंबई ला जाणाऱ्या साठी आठवड्यातून हमसफर एक एक्स्ट्रा ऑप्शन झाली आहे. वाया मुंबई जोधपुर श्री गंगानगर प्रवास असणार आहे.
. श्री गंगानगर(राजस्थान ते तीरुचीपल्ली १४७१५ असा क्रमांक असून बेळगाव ला दर बुधवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी तर तीरुचीपल्ली ते श्री गंगानगर गाडी चा क्रमाक १४७१६ असा असून शुक्रवारी रात्री १०वाजून १० मिनिटांनी वाजता बेळगाव ला येणार आहे .