बेळगाव दि 22- बळ्ळारी नाल्यात होणारे अतिक्रमण अधिकारी थांबवणार का आंम्ही शेतकरी थांबवू ? असा इशारा निवेदना द्वारे देण्यात आला. शर्टकऱ्यांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं.
जूनेबेळगा-हालगा रस्ता बळ्ळारी पूल बाजूला जूनेबेळगाव हद्दित महेंर धोंगडी व त्यांच्या भावानी शेती जमिन नाल्याला लागुन खरेदी केली पण आता त्याच जागेत ते भराव टाकून बेकायदेशीरपणे आपली जागा आहे म्हणून बळ्ळारी नाल्यात संरक्षणार्थ दंड फोडूनही आत 25ते30 फूट अतिक्रमण करून भिंत बांधताहेत.ते पाहून शेती बचाव समिती व परिसरातील शेतकर्यांनीं विरोध करून थांबवल परत शहापूर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार, जिल्हाधिकारी, मनपा आयूक्त यांना सरकारी मालमत्तेत होणारे अतिक्रमण थांबवून शेतकर्यांना पावसाच्या पूरापासून वाचवत गाळही काढा म्हणून 8 एप्रिल ला निवेदन दिले.तरीही तो माजलेला मालक महेंद्र धोंगडी आणी त्याचे भाऊ अतिक्रमण काम चालूच करताहेत याची पोलीस स्टेशन व मनपा अधिकार्यांना कल्पना दिली पण त्यालाही ते दाद देत नाहीत म्हणून आज पून्हा निवेदन पोच प्रत जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधाकारी डॉ. सुरेश इटनाळ यांच्याशी चर्चा करून ते काम त्वरित थांबवा अन्यथा आपल जर हे अतिक्रमण करणारे मुजोर ऐकत नसतील आंम्ही समस्त शेतकरी थांबवू आणी आमचे पीकांचे होणारे नूकसान थांबवू.हे ऐकून उपजिल्हाधाकार्यांनी तत्पर मनपा अभियंत्या निपाणीकर यांना तहशिलदारनां तेथील प्रत्यक्ष पहाणी करून अतिक्रमण झालेली जागा जेसीबीने पूर्ववत करा म्हणून आदेश दिला.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर,एपीएमसी सदस्य-तानाजी पाटील,महेश मुतगेकर,शेती बचाव समितीचे राजू मरवे,सूभाष लाड,वडगाव क्रूषी पत्तिन सोसायटी अध्यक्ष गंगाधर बिर्जे,अम्रूत भाकोजी,देविदास चव्हाण, किर्तिकूमार कूलकर्णी,अनंत बाबली,लक्ष्मण बाळेकूंद्री,शिवाजी तारिहाळकर,शहापूरकर,शांताराम होसूरकर सह अनेक शेतकरी उपस्थित होते.
या अतिक्रमण संबधी कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच कृषीमंत्री यांनाही निवेदन प्रत पाठवली आहे.
बातमी – राजू मरवे