बेळगाव दि 15- अलारवाड क्रॉस नजीक महा पालिकेच्या सांड पाणी प्रकल्पासाठी भु संपादन प्रक्रियेस पालिका अधिकाऱ्यानी सुरुवात केली आहे . बुधवारी सकाळी पालिका आयुक्त शाशिधर कुरेर यांच्या नेतृत्वाखाली जे सी बी सह आलेल्या पथकान आलारवाड क्रॉस येथे आलेल्या पथकांन मार्किंग कामास सुरुवात केली आहे.
हालगा येथील शेतकऱ्यांची18 एकर सुपीक जमीन पालिकेने 2011 ला सांड पाणी प्रकल्पाला संपादित केली आहे या निर्णयास शेतकऱ्यानी उच्च न्यायालयात एक सदस्यीय खंड पिठा पुढे याचिका दाखल करून अवाहन दिल होत . या वर उच्च न्यायलयान शेतकऱ्यांची याचिका फेटाळली होती या विरोधात शेतकऱ्यानी पुन्हा दुसऱ्यांदा डबल बेंच कडे अपील केलं आहे .
डबल बेंच कडे याचिका दाखल केली असताना पालिका अधिकाऱयांनी शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनीत मार्किंग केलं आहे . प्रचंड पोलीस बंदोबस्तत दडपशाही ने पालिका अधिकार्यानी मार्किंग कामास सुरुवात केली आहे . बंजारा जमीन अश्या सांडपाणी प्रकल्पास संपादित करण्या ऐवजी सुपीक जमीन संपादित केली जात आहे . यावेळी पोलीस फोऊज फाटा पाहून शेतकरी विरोध सुद्धा करू शकले नाहीत . शेतकरयांच जमिनीत पीक अस्तेवेळी प्रशासनाकडून जमिनीचे मार्किंग करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जात आहे . प्रशासनाने उच्च न्यायालयात केव्हेट घेतल्यामुळं आणि शेतकरी डबल बेंच समोर अपील केल्याने याची सुनावणी न्याय प्रविष्ट असताना मार्किंग करणे दडपशाही आहे
हालगा सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी अल्पभूधारक शेतकर्यांना कंगाल करण्यापेक्षा हिम्मत असेल तर बाजूलाच एक नेत्याचा मोठा पडीक डाग आहे त्यात उभारुन दाखवा आणी हालगा पूलाजवळ जूनेबेळगाव शिवारात रस्त्याला लागून महेंद्र धोगंडी आणि त्यांच्या भावांनी कपांउड भिंत बांधण्यासाठी त्यांची जागा आहे म्हणून बळ्ळारी नाल्यात 25,30 फूट जागा अतिक्रमण करत आहेत त्यासाठी शेतकर्यांनी ते काम अडवून शहापूर पोलीसात तक्रार,तसच जिल्हाधिकारी, मनपा दक्षिण अभियंत्या निपाणीकरनां निवेदन दिलय. त्याची लोकप्रतिनिधी शहनिशा करणार कि नाही ? कि परत अनगोळ,वडगाव, शहापूर, जूनेबेळगव,हालगा शेतकरी बंधूना पावसाच्या पूरात ढकलून देणार ? अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजू मर्वे यांनी दिली आहे