बेळगाव दि 7: बेळगाव शहर स्मार्ट करण्यासाठी माजी नगर सेवक संघटना उपयुक्त सिद्ध होणार आहे योग्य वेळी या संघटनेची स्थापना झाली असून माजी नगर सेवकांनी शहर स्मार्ट करण्या साठी मार्ग दर्शन करावं असं आवाहन महापौर संज्योत बांडेकर यांनी केलं आहे.
बेळगाव मध्ये मंगळवारी आय एम इ आर सभागृहात आयोजित माजी नगर सेवक संघटनेच्या उदघाटन कार्यक्रमात सत्कार स्वीकारल्या नंतर त्या बोलत होत्या. यावेळी श्री सिद्धराम स्वामीजीचया हस्ते माजी नगरसेवक संघटनेच उदघाटन करण्यात आलं .यावेळी जिल्हाधिकारी एन जयराम, संघटनेचे अध्यक्ष माजी महापौर नागेश सातेरी, कार्याध्यक्ष सिद्दनगौडा पाटील होते. यावेळी नूतन महापौर उपमहापौरांचा सत्कार करण्यात आला.
माजी नगर सेवकानीं पालिकेच्या बाहेर राहून शहराच्या विकासात योगदान धयाव असं मत जिल्हाधिकारी एन जयराम यांनी केलं .