Sunday, November 17, 2024

/

महापौर समितीचाच होऊस पायजे

 belgaum

आज महत्वाचा दिवस हाय, म्हा नगर पालिकेत महापौर कोन होनार म्हणोन सगळीच डोळे लावून बसल्याताय, कायबी करा खरं म्हापौर समितीचाच होऊस पायजे हेच आमचं सांगणं हाय.

थोडे राजकारणी कन्नड भाषिक सत्ता आण्णार म्हणोन चंग बांधोन बसल्याताय, थोडे गट करोन सत्यानाश करूच्या तयारीत हाताय, आमदार संभाजीरावांन मीय्या सगळं बघतो म्हटल्यानाय, आमच्या मनात धुगढुग लागले , सत्ता हातीन जाऊ देऊ नकाशी एवढी काळजी घेऊस लागणार हाय, कायबी करा मराठी माणसास खाली पडोस देउंकाशी हेच आमचं म्हणणं हाय.

आमचे नगरसेवक निष्ठावान हायीत यात काय वाद न्हाय, त्यासना कोणतरी भूलऊस बघ्याल, आजच्याच दिस म्हत्वाचा हाय, हे ध्यानात ठेवताली गरज हाय.

एक वरसात आमदारकीची निवडनोक येऊले, त्यात मराठी माणसास झेंडा लावतला अश्याल तर अत्त संयम पाळूस लग्याल. सगळ्यांनी मियाच खुर्चीवर बसतो म्हटल्यानी तर सगळा इस्काटा होऊ शकताय, हिसका दाखऊस सज्ज ऱ्हावा, एवढीच मराठी माणसाची मागणी हाय.

maha palika building

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.