एकीकडे सुरुवातीच्या काळात टेस्ट त्यानंतर एकदिवसीय आता टी-20 असा आंतर राष्ट्रीय स्तरा वरील क्रिकेटचा लोकप्रियतेचा प्रवास सुरूच आहेच तर दुसरीकडे बेळगाव सारख्या लहान शहरात गल्ली क्रिकेट म्हणून हॉफ पिच क्रिकेट लोकप्रिय होत आहे. सध्या शहरात चर्चा सुरू आहे अनगोळ येथील एस आर एस स्पोर्ट्स च्या वतीन सुरु असलेल्या हॉफ पिच क्रिकेट स्पर्धेची …
दर रोज रात्री सुरू असलेल्या हॉफ पिच क्रिकेट स्पर्धेची अनेक खास वैशिष्ट्य आहेत त्यापैकी गेले कित्येक दिवस लागुन एस आर एस स्पोर्ट्स अनगोळ यांनी तयार केलेलं खास मैदान होय . जस टी-20 आय पी एल चा थरार पहायला मिळतो त्याच धर्ती वर मैदाना वरची हिरवळ, फ्लड लाईट, म्युजिक,प्रेक्षकांचा जल्लोष ,पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर पंचाना मदती साठी सी सी टी व्ही कॅमेरे, मोठ्या एल ई डी टी व्ही स्क्रीन आणि तिसरा अंपायर बसविला आहे . या सगळ्या रोषणाइत चारी बाजुंनी हे स्टेडीयम प्रेक्षकांनी खचा खच भरत आहेत . जर का निर्णय देण्यात मैदानी पंच चुकत असतील आणि निर्णया वर विरोधी संघाचा आक्षेप असेल तर सी सी टी व्ही बिग एल इ डी स्क्रीन वर पाहून तिसरा पंच निर्णय देत आहे. आणखी एक विषेश म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे यष्ट्या ना लाल लाईट बसविला आहे यष्टी पडली की लाल लाईट मूळ उठून दिसत आहे .
बेळगाव कोल्हापूर सांगली इचलकरंजी गोवा येथील नामवंत हॉफ पिच स्पेशास्लिस्ट 48 संघानी या स्पर्धेत भाग घेतला असून रात्री च्या वेळी भरलेल्या सामान्यातून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होत आहे. एस आर स्पोर्ट्स च अध्यक्ष संयोजक कुरिहाळकर यांनी बेळगाव live सांगितले की सध्या स्पर्धा बहरात असून दोन दिवसात अंतिम सामना होणार आहे गर्दी मूळ टिळक वाडी पोलीस निरीक्षक जाधव दर रोज मैदानास भेट देत आहेत .विजेत्या संघास एक लाख रुपयांच बक्षीस देण्यात येणार असून प्रेक्षका साठी आम्ही खास गॅलरी बनविली आहे.