बेळगाव दि 20-आज सगळीकडे सोशल मीडियाचे कौतुक होत असते. मात्र वृत्तपत्र विक्रेतेच खरे सामाजिक माध्यम आहेत. त्यांच्यासाठी काम करणारी पत्रकार विकास अकादमी ही संस्था मोलाचे कार्य करीत आहे, गरीब वृत्तपत्र विक्रेते हेरून त्यांना सायकली वाटण्याचे काम थोर आहे.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष फोरम चे सतीश तेंडुलकर बोलत होते.
येथील पत्रकार विकास अकादमीच्या वतीने बेळगाव शहर आणि परिसरातील ६ वृत्तपत्र विक्रेत्यांना सायकल देण्यात आल्या. या उपक्रमाला माजी अध्यक्ष फोरम तसेच विशाल इन्फ्राबिल्ड चे मालक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी मदत केली. विजय पाटील अनुपस्थित होते मात्र फोरम च्या तेंडुलकर आणि सेवंतिभाई शहा यांच्या हस्ते सायकली वाटण्यात आल्या.
अकादमीच्या नेहरू नगर येथील कार्यालयात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षयस्थान ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक सर्वकाळचे संपादक , अकादमीचे अध्यक्ष सुभाष धुमे यांनी भूषविले होते. सेक्रेटरी प्रसाद प्रभू यांनी आजवरच्या अकादमीच्या उपक्रमांची माहिती दिली. २० हुन अधिक सायकली वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ विश्वस्थ प्रशांत बर्डे, नेताजी जाधव तसेच विलास अध्यापक, रवी नाईक, द्वारकानाथ उरणकर, रमेश हिरेमठ, जगदीश दड्डीकर , प्रकाश बिळगोजी उपस्थित होते.