Thursday, December 19, 2024

/

बेळगाव महा पालिकेवर मराठीचा झेंडा संज्योत बांदेकर महापौर तर नागेश मंडोळकर उपमहापौर पदी

 belgaum

बेळगाव दि १ : बेळगाव महा पालिकेवर पुन्हा एकदा मराठीचा झेंडा फडकला असून संज्योत बांदेकर या महापौर तर नागेश मंडोळकर यांनी उपमहापौर पदी निवड करण्यात आली आहे . बुधवारी  महा पालिका सभागृहात झालेय निवडणुकी बांदेकर आणि मंडोळकर विजयी झाले. १९८४ साली स्थापित झालेल्या बेळगाव महा पालिकेच्या २७ व्या महापौर बनण्याचा मान संज्योत यांना मिळाला आहे तर आता पर्यंत २७ पैकी २३ वेळा मराठी तर केवळ चार वेळा कन्नड माणूस महापौर पद भूषविला आहे कन्नड महापौरा पैकी सिद्धनगौडा पाटील, प्रशांत बुडवी यल्लाप्पा कुरबर, एन बी निर्वाणी या सामील आहेत .

संपूर्ण कर्नाटक सानी महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीलेल्या बेळगाव महा पालिकेत मराठी भाषिक महापौर उपमहापौर झाल्याने पुन्हा एकदा बेळगाव वर मराठी माणसाच वर्चस्व आहे हे सिद्ध झाल आहे.  बुधवारी झालेल्या निवडणुकीत एकूण ५८ नगर सेवकांच्या महा पालिकेत ४ लोक प्रतिनिधी देखील मतदानास हजर होते. कन्नड आणि उर्दू गटात्तील फुट आणि मराठी भाषिक नगरसेवकांची एकजूट हे या विजयाचे खास वैशिठ्य आहे.  महापौर संज्योत बांदेकर यांना ३२ तर कानडी उर्दू गटाच्या पुष्पा पर्वतराव यांना ९ जयश्री माळगी यांना १७ तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत नागेश मंडोळकर यांना ३२ तर कन्नड आणि उर्दू गटाच्या मुजम्मील डोणी यांना १७ तर फहीम नाईकवाडी यांना ७ मत पडली. नुकताच झालेल्या मराठा मोर्चा यशामुळे बेळगावातील दोन गटात विखुरलेल्या मराठी नगर सेवकांना एकत्र याव लागल आणि मराठीचा झेंडा फडकला.

कॉग्रेस लोक प्रतिनिधीची हजेरी प्रकाश हुक्केरी तटस्थ

महापौर उपमहापौर निवडणुकीत कन्नड आणि उर्दू गटात थेट दोन गट पडले होते   आमदार फिरोज सेठ आणि सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वात ७ तर दुसऱ्या गटात १७ असे नगरसेवक दोन गटात विखुरले होते.  आमदार फिरोज सेठ, माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मतदानाचा हक्क बजावला तर भाजपचे खासदार सुरेश अंगडी आमदार संजय पाटील मतदानास अनुपस्थित राहिले. कॉंग्रेस हाय कमांड नी आदेश बजावल्या नंतर खासदार प्रकाश हुक्केरी मतदानास हजर राहिले मात्र त्यांनी कुणाच्याही बाजूनी मतदान केल नाही ते तटस्थ राहिले. भाजपचे खासदार सुरेश अंगडी आणि आमदार संजय पाटील उपस्थित राहून मतदान जरी केल असत तर कन्नड आणि उर्दू गटाची संख्या ३० झाली असती आणि मराठी गट ३२ त्यामुळे मराठी गटाचा विजय हा निश्चित होता .

सतीश जारकीहोळी विरुद्ध रमेश जारकीहोळी

राज्य कॉंग्रेस हाय कमांड ने कन्नड महापौर बनविण्याचा चंग बांधलाच होतामात्र बेळगावातल्या कन्नड आणि उर्दू भाषिक नगरसेवकात सरळ दोन गट पडले होते त्यामुळे मराठी गटापेक्षा संख्येने कमी असलेले कानडी आणि उर्दू नगरसेवक दोन गटात विखुरले होते.पालक मंत्री रमेश जारकीहोळी त्यांचे बंधू लखन जारकीहोळी यांनी १७ तर आमदार फिरोज सेठ आणि माजी पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांचे कडे ९ नगरसेवक होते कानंडी गटात फुट पडल्याने राज्य कॉंग्रेस हाय कमांड आदेश देऊन देखील याचा काहीही उपयोग झाला नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.