बेळगाव दि 22- हालगा बेळळा री नाल्यावर महेंद्र धोंगडी यांनी केलेलं अतिक्रमण महा पालिकेच्या वतीनं जे सी बी ने हटविण्यात आलं आहे. धोंगडी नावाच्या शेतकऱ्यानं नाल्या वरच्या सरकारी जमीनीत अतिक्रमण केल्याच्या विरोधात सर्व प्रथम आवाज बेळगाव live ने उठवला होता .शेती बचाओ समितीच्या वतीनं होणाऱ्या आंदोलनाची दखल घेत आवाज उठवला होता पाठपुरावा केला होता याची दखल घेत बुधवारी महा पालिकेच्या जे सी बी ने नाल्या वरच अतिक्रमण हटवल.
पालिका अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्या आदेशा नंतर पालिकेच्या जे सी बी सदर अतिक्रमण हटविल आहे. यावेळी ए पी एम सी सदस्य महेश जूवेकर,शेतकरी राजू मरवे,शिवाजी तारिहाळकर,शांताराम होसूरकर तसेच माधवपूर भागाचे तलाठी शिंदे, उपस्थित होते .महा पालिका दक्षिण अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर नीं जेसिबीने बळ्ळारी नाल्यातील बांधकाम केलेले बिम महेंद्र धोंगडीच्या समोरच काढण्याचा आदेश देऊन कारवाई केली. तलाठी शिंदे यांनी अतिक्रमण कर्त्याला 95 कर्नाटक लँड कायद्याने पिकाऊ जमीनीत बेकायदेशीर काम केलाय म्हणून तूमची जमीन सरकारमध्ये का जमा करुनये म्हणून नोटीस बजावणार म्हणून ठणकावुन सांगितलं.शेतकऱ्यांच्या व्यथा जानून मूजोरानां अद्दल घडवल्याबद्दल अधिकारी आणि युवा ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर यांचं कौतुक होत आहे.
Trending Now