बेळगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या लष्कराच्या केंद्राची स्थापना 1828 साली झाली होती. देशाच्या सूरक्षेचा दृष्टिकोन ठेऊन बेळगाव शहराच्या पश्चिम भागात कॅटोन्मेंट बोर्ड आणि लष्कराच केंद्र उभारण्याचा निर्णय ब्रिटिशानी घेतला होता .शहराचं पोषक हवामान, झाडी आणि जवळच गोव्यात असलेली पोतुर्गीज वसाहत यामुळे बेळगावातच ब्रिटिशांचा इंक्लेव व्हावा करण्याचा निर्णय घेतला होता .यासाठी लष्कर केंद्र आणि कॅटोन्मेंट बोर्ड सुरु करण्यात आले होते.
बेळगावातील लष्कर केंद्रात सुरुवातीला जनरल कमांडिंग ब्रेगेडिअर,डेप्युटी असीस्टंट जनरल, डेप्युटी असीस्टंट अडजूडंट,जनरल फॉर मस्केटरी, कॅटोन्मेंट मॅजिस्ट्रेट, कार्यकारी अभियंता, कार्यकारी आयुक्त, कॅम्प चॅप्लिन,फोर्ट चॅप्लिन,रोमन कॅथॉलिक चॅप्लिन, स्टाफ सर्जन,बाराक मास्टर, हे सर्व दर्जाचे अधिकारी त्याकाळी बांधलेल्या कॅटोन्मेंट नवीन इमारतीत बसत होते .
1832 मध्ये कॅटोन्मेंट बोर्डाची स्थापना करण्यात आली छावणी सीमा परिषद कायदा 1924 अंतर्गत केंद्र सरकार च्या प्रशासनात कार्यरत होते.
प्रथम 1828 साली लष्कर केंद्र उभारण्यात आले त्या नंतर 1832 साली केंद्रास नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कॅटोन्मेंट बोर्डाची सुरुवात करण्यात आली.
बेळगाव कॅटोन्मेंट बोर्ड हे कर्नाटकातील एकमेव क्लास वन कॅटोन्मेंट बोर्ड असुन सुरुवातीला 1777 एकर मध्ये पसरलं होत आज त्याची व्याप्ती शहराच्या पेक्षा अधिक आहे. छावणी सीमा परिषद क्षेत्रात कॅम्प ,किल्ला झोन आणि मिलिटरी एरिया सामील आहे.जुन्या बॉम्बे रेजीडन्सी मधल्या 5 मिलीटरी स्टेशन पैकी बेळगाव हे मुख्य केंद्र होत .
1882 मध्ये बेळगाव च्या लष्करी केंद्रातील लष्कराच्या तुकडीत 162 पुरुष जवान आणि 110 घोड्यांचा समावेश होता. ब्रिटिश रेजिमेंट च्या सातव्या कंपनीत 770 पुरुष होते स्थानिक रेजिमेंट मध्ये 1475 रँक जवानांचा समावेश होता.
190 वर्षापूर्वी म्हणजे 1828 साली ब्रिटिशानी बेळगाव ची ओळख एक डिफेन्स कार्यालये असणार शहर म्हणुन केली होती त्यामुळेच आजच्या घडीला बेळगावात संरक्षण खात्याची अनेक कार्यालये आहेत .त्यामध्ये मराठा लाईट इंफन्ट्री रेजिमेंटल केंद्र, ज्युनियर लिडर्स विंग कमांडो प्रशिक्षण केंद्र, राष्ट्रीय मिलिटरी स्कुल, सांब्रा एअर मन ट्रेनिंग सेंटर, केंद्रीय रिजर्व पुलिस दल प्रशिक्षण केंद्र, इंडो तिबेटियन बॉर्डर पुलीस ट्रेनिंग सेंटर,नेव्हल बेस स्टॊक डेपो, विमान तळ आदी कार्यालयांचा समावेश आहेत.