बेळगाव दि २१ – गणेशपूर कडून बेळगाव शहराकडे दुचाकी वरून येणाऱ्यास मागे बसलेल्या व्यक्तीने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गणेशपूर रोड फेडरल बँक जवळ मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे . गणेशपूर येथील ग्राम पंचायतीचे सदस्य मोनेश्वर गरग अस या युवकाच नाव असून मराठी भाषिक युवा आघाडीचा उपाध्यक्ष आहे . जखमी मोनेश्वर वर बेलगा सिविल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मौनेश्वर गरग हा सकाळी सात च्या सुमारास आपल्या दुचाकी वरून गणेशपूर हून बेळगावच्या दिशेने येत होता त्यावेळी गणेशपूर येथील राजू मोरे नावाच्या युवकाने माझी रिक्षा बंद पडली आहे असे सांगून लिफ्ट मिळविली आणि मागे बसून फेडरल बँकेजवळ असताना अचानक मागून छाती आणि गळ्यावर चाकूने हल्ला केला यात मोनेश्वर सह दोघेजण गाडीवरून कोसळले या नंतर राजू मोरे हा मोनेश्वर ची गाडी घेऊन पसार झाला . या नंतर घटना स्थळी बघ्यांची एकक गर्दी झाली होती . घटना स्थळी कॅम्प पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आणि मोनेश्वर यास उपचरा साठी सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आल आहे . या प्रकरणी कॅम्प पोलिसात गुण नोंद झाला असून आरोपी राजू मोरे याचा शोध सुरु आहे .