बेळगाव दि २१- भाजप जिल्हाध्यक्ष पद हिरावले गेलेले माजी भाजप अध्यक्ष वकील अनिल बेनके यांनी भाजप ला रामराम करण्याचा निर्णय घेतला असल्याची सूत्रांकडून माहिती उपलब्ध झाली असून ते पुन्हा स्वगृही म्हणजेच एकीकरण समितीच्या वाटेवर आहेत. असे समजते.
गेल्या काही वर्षात राष्ट्रीय पक्षांनी मराठी भाषिकांचा फक्त व्होट बँकेसाठी वापर करून घेतला आहे हे बेनके यांच्या भाजप जिल्हा अध्यक्ष पदावरून केलेल्या हकाल पट्टीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसं पाहिलं गेलं तर बेनके यांची यावेळी हकालपट्टी करण्यामागे खासदार सुरेश अंगडी यांचाच हात आहे असे बोलले जात आहे.स्वता अंगडी हे उत्तर विधान सभा मतदार संघातून इच्छुक असल्याने बेनके यांचा पत्ता अंगडी यांनीच कापला आहे अशी चर्चा आहे. खासदार सुरेश अंगडी यांची कन्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या सून होणार आहेत त्यामुळे अंगडी नसल्यास उत्तर विधान सभा मतदार संघातून अंगडी यांची कन्या सुद्धा दावेदारी करू शकते यामुळेच खासदारांनी बेनके यांना दूर केले आहे असे बोलण्यात येत आहे. भाजपात खासदार अंगडी ज्यांच्या पाठीशी असतात त्यांना कधीच उमेदवारी मिळत नाही हा इतिहास आहे जितेंद्र कदम , नागेश देसाई आणि मागील वेळी अनिल बेनके हि याचे उत्तम उदाहरण ठरले आहेत.
भाजप अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्या नंतर बेनके यांनी आपल्या समर्थकांच्या बैठकांचा झपाटा सुरूच ठेवला असून अजून भाजप सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला नाही मात्र ते एकीकरण समितीच्या सर्व हाय कमांड नेत्यांच्या भेटी गाठी घेऊन संपर्कात आहेत. खर तर मागील विधान सभेत बेनके यांना एकीकरण समितीतून उत्तर मतदार संघातून उमेदवारीची ऑफर होती मात्र त्यांनी भाजप चा रस्ता पकडल्याने त्यांना राजकारणात बॅकफुट वर यावं लागलं होतं. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकीकरण समितिने भाजप कॉंग्रेस मधून परतलेल्या अनेक दिग्गज नेत्यांना सामावून घेतलंय तसं अनिल बेनके यांनाहि एकीकरण समिती सामावून घेईल मात्र त्यांना मातृ भाषे साठी योगदान ध्याव लागेल मराठी साठी काम कराव लागेल . भाजप मधून काढले या एकाच मुद्द्यावर थेट समितीतून तिकीट मागण्यापेक्शा त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याची गरज व्यक्त होत आहे.बेळगाव liveने बेनके यांना संपर्क साधला असता त्यांनी अध्याप आपण भाजपा सोडल नसल्याच सांगितलं मात्र जर पक्ष घुसमट करत असेल तर मी एकीकरण समितीसाठी काम करू शकतो असे ते म्हणाले .उत्तर मतदार संघातून उम्मेदवारी मिळो किंवा न मिळो मराठी साठी काम करण्याची आपली इच्छा आहे.बेळगावात मराठी माणसाला शेवटी मातृभाषेशिवाय पर्याय नाही असे ही ते म्हणाले