बेळगाव दि २१- बेळगाव चोरला रोड अलीकडे मृत्यूचा साफळा बनत चाललाय कारण या रोडवर दररोज अनेक अपघतात घडताहेत अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. बेळगाव किणये ते कुसमळी पर्यंतच्या टप्प्यातझालेल्या अपघातात अनेक युवकांचे बळी गेले आहेत.
गोवा आणि सुरल कडे जाणाऱ्या लोकासाठी एक शोर्ट कट रोड म्हणून या चोरला रोडकडे वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे अनेक वाहनांचा वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात संख्या वाढत आहे गोवा आणि सुरळ हून दारू पिऊन बेळगाव कडे येणाऱ्या वाहन धारकांची संख्या अधिक असते टिप्पर ट्रक या सारखी अवजड वाहने अधिक वेगाने धावत असतात . चार दिवसापूर्वी झालेल्या अपघातात किणये येथील युवक ज्ञानेश्वर सुभाष पाटील हा युवक ठार झाला होता तर मागील आठवड्यात किणये कर्ले नावगे बहाद्दरवाडी सह अनेक गावातील अनेक युवकांचे झाले होते जीवे गेले होते जखमी झाले होते . वेगावर नियंत्रण नसल्याने हे अपघात होत असून शाळकरी मुल महिलाना या रोड वर ये जराने मुश्कील होऊन बसले आहे . जिल्हा प्रशासनाने वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना कराव्यात अन्यथा रास्ता रोको सह उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील लोकांनी दिला आहे