बेळगाव दि ५- कर्नाटक केसरी दावणगेरी चा पैलवान कार्तिक काटे याने घिस्सा डावावर हरियाना केसरी याला आसमान दाखवत आनंदवाडी ची दंगल आपल्या नावावर केली आहे. रविवारी सायंकाळी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आनंदवाडी आखाड्यात निकाली कुस्ती मैदानाच आयोजन करण्यात आल होत.
प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत यंदाचा कर्नाटक केसरी पैलवान कार्तिक काटे (८६ किलो)याने आपल्या पेक्षा २१ किलो वजनाने अधिक असलेल्या हरियाना केसरी (१०७ किलो) पैलवान मनीष याला आसमान दाखवत अंगणवाडी आखाडा जिंकला .हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत प्रथम क्रमांकाची ही कुस्ती १४ मिनिटे चालली . दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत जुनियर राष्ट्रीय चम्पियन हरियाना च्या पैलवान विशाल याने बेळगाव महापौर केसरी विजेता बाळू निर्वानटटी यास दहाव्या मिनिटाला फ्रंट साल्तु डावावर चारीमुंड्या चीत करत ही कुस्ती जिंकली शेवटच्या क्षण पर्यंत बाळू निर्वानटटी याने प्रतिकार केला मात्र हरियाणाच्या पैलवान समोर शेवटी हार पत्करावी लागली. यावेळी आनंदवाडी कुस्ती आखाड्यात ५० हून अधिक लहान मोठ्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या.