- jबेळगाव दि 7 :बेळगाव जिल्हा भाजप महानगर च्या अध्यक्षपदी राजेंद्र हरकुनी यांची निवड करण्यात आली आहे. या पदावरून अनिल बेनके यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या पदावरून भाजपने मराठी माणसाला हटविले अशी चर्चा सुरु आहे, बेनके यांना नेमके कशासाठी हटविले हे स्पष्ट झाले नाही.
अनिल बेनके भाजपचे बेळगाव उत्तर मधून उमेदवार ठरणार असल्याचीही चर्चा होती त्यांची अनेक प्रकरणे उघड झाल्याने त्यांच्यावर शिक्षा म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचेही बोलण्यात येत आहे.