बेळगाव दि २३ : सदाशिव नगर बेलदार छावणी भागात दोन गटात झालेला वाद सोडवायला गेलेल्या ए पी एम सी पोलीस निरीक्षक जे एम कालीमिर्ची यांना युवकांच्या गटाने धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे .
या भागात दोन गटात वाद सुरु असल्याची माहिती मिळताच निरीक्षक कालीमिर्ची यांनी घटना स्थळी धाव घेऊन भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला सगळ्या युवकांना घटन स्थळावरून हटवताना पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या युवकांना कालीमिरची समजावयाचा प्रयत्न करत होते यावेळी युवकांनी कालीमिरची यांचा शर्ट चा कॉलर पकडला आणि धक्का बुक्की केली . किशन आणि अझरूद्दीन अशी या युवकांची नाव असून दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे