बेळगाव दि १३ : मराठी क्रांती मूक मोर्चात सामील होण्यासाठी परगावाहून आलेल्या मराठी बांधवाना शक्य तितक्या उपहार पाकिटांच वितरण करून आगामी दोन दिवस मोर्चा लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जनजागृती बैठक घेण्याचा निर्णय विमल फौंडेशन च्या वतीने आयोजित बैठकीत घेण्यात आलाय.
सोमवारी सकाळी गुडसशेड रोड येथील कार्यालयात नितीन भातकांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली यात मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील होऊन आगामी तीन दिवस विविध ठिकाणी बैठका घेऊन जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले . बैठकीत अनुप काटे सतीश पाटील किरण नाईक, विजय चौगुले रोहन जाधव भास्कर पाटील प्रवीण पाटील संतोष पेडणेकर आदी उपस्थित होते .