बेळगाव दि १५ : मराठी क्रांती मूक मोर्चा शांतता आणि संयमाने यशस्वी करून दाखवू असा निर्धार शिव प्रतिष्ठान चे अध्यक्ष किरण गावडे यांनी व्यक्त केला . बेळगाव तालुक्यातील सुळगे येळ्ळूर येथे मराठी क्रांती मोर्चा जनजागृती सभेत बोलताना व्यक्त केले . शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पुण्याकित झालेली राजहंस गडाच्या पायथ्याशी असलेल्या सुळगा राजहंसगड नागेनहट्टी सह अनेक गावातील मराठी मोर्चा जनजागृती सभा घेण्यात आली यावेळी शेतकरी नेते नारायण सावंत यांनी हा केवळ मराठी मोर्चा नसून शेतकऱ्यांचा आवाज उचलणारा देखील मोर्चा असल्याने शेतकरयांनी हजारोच्या संख्येने सहभाग दाखवून भगवं वादळ काय असतंय ते दाखवून द्या असं आवाहन केलं .


