बेळगाव दि २२: सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा वकालात घेऊ नये आणि आरोपींना कडक शासन करा या मागणी साठी महिला आघाडीच्या वतीने बार असोसिएशन च्या अध्यक्ष आणि पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आल .
बुधवारी सायंकाळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त जी राधिका आणि बार असोसिएशन चे अध्यक्ष एस एस किवडसन्नावर यांना भेटून निवेदन देण्यात आल . या प्रकरण मुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने पोलीस खात्याने बलात्कार प्रकरणातील आरोपी ना कडक शिक्षा करावी तसच एक सामाजिक भान म्हणून कोणत्याही वकिलान वकालात पत्र घेऊ नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . यावेळी माजी महापौर वंदना बेळगुंदकर नगरसेविका सुधा भातकांडे,रूपा नेसरकर यांच्या सह टी के पाटील बाळासाहेब काकतकर, नारायण किटवाडकर आदी उपस्थित होते .