बेळगाव दि ८ : १६ फेब्रुवारी रोजी मराठा आणि मराठी क्रांती तोंडी परवानगी देऊन २४ तास संपायच्या आत बेळगाव पोलिसांनी मोर्चाचे आयोजकांना नोटीस बजावली आहे . पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी एकूण ८ जणांना ही नोटीस बजावली असून मूक मोर्चात भाषिक तेढ निर्माण होणार नाही कोणताही गोंधळ होणार नाही याची याचा एका प्रतिष्ठित व्यक्तीचा हमी बॉंड देऊन ध्यावा अस नोटीस मध्ये नमूद करण्यात आलंय .
मराठा मोर्चाचे आयोजक राजेंद्र मुतगेकर, गुणवंत पाटील ,प्रकाश पाटील, देपक दळवी ,प्रकाश मरगाळे,मालोजी अष्टेकर ,नेताजी जाधव आणि सुनील जाधव यांना नोटीस बजावण्यात आली आहे . कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून तुम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हा मूक मोर्चा काढत आहात या मोर्चात दोन भाषिकात तेढ निर्माण होऊन शांतता भंग होऊ शकते अस देखील नोटिशीत म्हटल आहे . कलम १०७ नुसार सदर नोटीस बजावण्यात आली आहे . नोटीस नंतर बेळगाव लाईव्ह बेळगावातील मराठी जनतेला पुन्हा एकदा आवाहन करत असून जनतेने अगदी शांततेने हा मूक मोर्चा यशस्वी करायचा आहे. कर्नाटक पोलिसांनी जशी नोटीस पाठवली आहे त्याचा फोटो वाचकासाठी आम्ही दिला आहे .
नोटीशीची चर्चा करू नये :महादेव पाटील
कृपया अशी नोटीस आली म्हणून कुणीही गडबडून जाऊ नये, कारण हा मोर्चा मूक मोर्चा आहे,
तेंव्हा आपण आपापल्या तयारीला लागावे, कोणीही यासंदर्भात ग्रुपवर किंवा सोशल
मिडियावर चर्चा करू नये अस आवाहन मराठी भाषिक युवा आघाडीचे महादेव पाटील यांनी बेळगाव लाईव्ह कडे केली आहे