बेळगाव दि १५ :मूक मोर्चात बेळगावचे सारे झाडून सहभागी होणार आहेत. यामुळे सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. विशेषतः भाजी मार्केट आणि बाजारपेठा बंद राहणार असून याची नोंद घेण्याची गरज आहे.
मोर्चाला सुरुवात होताना तसेच त्यापूर्वीही वाहन प्रवेश नसेल, यामुळे शाळा कॉलेजातील मुलांची गैरसोय होऊ शकते, शिक्षक पालक व शिक्षण खात्याने इकडे लक्ष्य दिले आहे. गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण संस्था बंद ठेऊन त्यावर मार्ग काढता येईल.
पोलीस आयुक्त टी जी कृष्णभट्ट यांनी गुरुवारी सकाळी ६ ते मध्यरात्री १२ पर्यंत शहर आणि परिसरात मध्यविक्रीवर निर्बंध घातले आहेत, यामुळे सर्व बार, वाईन शॉप व दारू दुकाने बंद राहणार आहेत. शहरातील नागरिकांनी नो वेहिकल डे पळायचा आहे गरजे शिवाय कोणीही आपली दुचाकी अथवा चार चाकी घेऊन घर बाहेर पडू नये अस संयोजकांनी आवाहन केल आहे .