बेळगाव दि २४ : भारतीय रेल्वे लवकरच कर्नाटका साठी तीन नवीन हमसफर गाड्या सुरु केल्या असून यातील १६ डब्यांची संपूर्ण वातानुकुलीत हमसफर एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव शहरा वरून धावणार आहे . १४७१६ तिरुचीपल्ली ते श्री गंगानगर(राजस्थान) ही गाडी 11 मार्च पासून बेळगाव वरून धावणार आहे. या रेल्वेत जी पी एस सिस्टम सह अनेक खास सुविधा देण्यात आल्या आहेत .
या हमसफर गाडीत प्रत्येक बुगीत एल इ डी बसविली असून धुम्रपान आणि आग रोखण्यासाठी सेन्सर देखील बसविलेली आहेत . बायो प्रसाधन गृह आणि चहा कॉफी देण्यासाठी वेंडिंग मशीन आधुनिक पद्धतीची कचरा कुंड या हमसफर गाडीची वैशिठ्ये आहेत. बेळगाव हून राजस्थान गुजरात आणि मुंबई ला जाणाऱ्या साठी आठवड्यातून हमसफर एक एक्स्ट्रा ऑप्शन झाली आहे .
. श्री गंगानगर(राजस्थान ते तीरुचीपल्ली १४७१५ असा क्रमांक असून बेळगाव ला दर बुधवारी सायंकाळी ५ वाजता तर तीरुचीपल्ली ते श्री गंगानगर गाडी चा क्रमाक १४७१५ असा असून शुक्रवारी रात्री १० वाजता बेळगाव ला येणार आहे .
बेळगाव लाईव्ह च्या वाचकासाठी आम्ही वेळा पत्रकाचा फोटो दिला आहे तो तुम्ही पाहू शकता