बेळगाव दि २७ : कोणत्याही परिस्थितीत बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकच पुढचा महापौर असेल असा ठाम विश्वास एकीकरण समितीचे दक्षिण आमदार संभाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे . सोमवारी सायंकाळी मराठी गटाच्या वतीने पत्रकार परीषदेच आयोजन करण्यात आल होत. सध्या स्थितीत जरी संभ्रमाच वातावरण असल तरी सभागृहात बहुमत सिद्ध करताना आम्ही ३२ नगरसेवक एकच आहोत अस पाटील म्हणाले.
सध्या मराठी भाषिक नगर सेवकातील सत्ताधारी बेळगाव विकास आघाडीकडे २४ आणि समविचारी आघाडीकडे ८ अस संख्याबळ दिसत असल तरी जनतेची इच्छा मराठी भाषिक महापौर व्हावा अशी आहे त्यामुळे जनतेच्या विश्वासाला आम्ही तडा जायला देणार नाही अस देखील पाटील म्हणाले. बेळगाव विकास आघाडीच्या माध्यमातून ज्या ३२ जणांनी महापौर उपमहापौर आणि स्थायी समित्या पद मिळवली आहेत त्यांना गटाच्या विरोधात जाण्याचा अधिकार नाही किंबहुना ते जाऊच शकत नाहीत त्यामुळे त्यां नगरसेवकांनी स्वगृही परतावं अस अवाहन ही पाटील यांनी यावेळी केल . सुरुवातीला नगरसेवक अनंत देशपांडे यांनी पत्रकारांच स्वागत केल .
पाटील अजूनही किंग मेकर?
गेल्या काही दिवसात बेळगाव दक्षिण चे आमदार संभाजी पाटील आपल्या जुन्या शैलीत नव्हते अस वातावरण होत मात्र सोमवारी अचानक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडताना ते आक्रमक दिसत होते . पूर्वी केवळ चार पाच नगरसेवकासह विजयश्री खेचून आणून अनेकदा त्यांनी महापौर पद आपल्याकडे ठेवली होती सध्या त्यांच्या कडे २४ हे मोठ संख्याबळ आहे त्यामुळे या निवडणुकीत मराठी भाषिक महापौर करून पुन्हा एकदा आपण महा पालिकेचे किंग मेकर आहोत हे दाखविण्याची योग्य वेळ आली आहे. मात्र सध्या संभ्रमाच्या स्थितीत आमदार पाटील यांच्यावर सगळी मदार आहे ते कोणती खेळी करून कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडते हे औत्सुक्याच आहे .
दांडेली, महाबळेश्वर आणि आंबोली राहणार वास्तव्य
मराठी गटातील समविचारी ९ नगर सेवक सोमवारी सायंकाळीच महाराष्ट्रात कोल्हापूर किंवा महाबळेश्वर लारवाना झाले आहेत तर कन्नड आणि उर्दू गटाच्या नगर सेवकांनी रविवारी रात्री पासूनच दांडेली आपला मुक्काम ठोकलाय. आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील २४ नगरसेवक मंगळवारी दुपारी आंबोली कडे अज्ञात स्थळी रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे . मराठी गटातून मीनाक्षी चिगरे, मधुश्री पुजारी, संज्योत बांदेकर तर उपमहापौर पदासाठी दिनेश रावळ राकेश पलंगे, मोहन भांदुर्गे, संजय शिंदे,मोहन बेळगुंदकर उपहापौर पदासाठी इच्छुक आहेत.