बेळगाव दि २८: मराठी भाषेत संवाद कमी होत आहेत भाषेवर इतर भाषांच अतिक्रमण सुरु आहे त्यामुळे भाषा हरवत चालली आहे याची जबाबदारी साऱ्यांनी घेतली पाहिजे असे विचार आर पी डी महाविध्यालायाच्या प्रा.आणि साहित्यिका शोभा नाईक यांनी मांडले .
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या.कुलकर्णी गल्लीतील पत्रकार संघाच्या कार्यालयात या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल होत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर उपस्थित होते. कर्नाटक अतिरिक्त निवृत्त न्यायाधीश विनय गोरे देखील उपस्थित होते . मराठी भाषेतील लिखाण वैविध्यपूर्ण आणि प्रगल्भ आहे भाषेतील रहस्य शोधल्यावर समृद्धता वाढली आहे अ म्हणजे अज्ञा ना पासून ते ज्ञ म्हणजे ज्ञानापर्यंत पोचणारी भाषा म्हणजे मराठी आहे. आपल्या जवळील आणि घरातील व्यक्तीशी संवाद कमी होत आहेत त्यामुळे इतर भाषांचे मराठीवर आक्रमण वाढले आहे मराठी संवाद वाढवून भाषा टिकवण्यासाठी जोड देता येईल असेही त्या म्हणाल्या. यावेळी प्रकाश माने, सुहास हुद्दार ,राजेद्र पोवार , महेश काशीद आदी पत्रकार उपस्थित होते.