बेळगाव दि २६ : कवीवर्य वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनी म्हणजे मराठी भाषा दिनी बेळगावात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे.गुरुवर्य वी गो साठे मराठी प्रबोधिनी च्या वतीने कॅम्प येथील मराठी विद्या निकेतन शाळेत सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोल्हापूरचे जेष्ठ साहित्यिक प्रा कृष्णात खोत हे प्रमुख वक्ते तर एअर इंडिया चे निवृत फ्लाईट इंजिनियर के के हुलजी ,उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा मराठी पत्रकार संघात कार्यक्रम
मंगळवारी २८ रोजी मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित केला जाणार असून आर पी डी कॉलेजच्या प्राध्यापिका आणि साहित्यिका शोभा नाईक या उपस्थित राहणार आहेत . कुलकर्णी गल्लीतील पत्रकार संघाच्या कार्यालयात सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.