बेळगाव दि ८ : बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठी क्रांती मोर्चा केवळ आठ दिवसावर येऊन ठेपला असताना बेळगाव मराठा क्रांतीमोर्चा संयोजकावर चारी बाजूनी मोर्चा यशस्वी करण्याची जबाबदारी आली आहे .
मुख्यता बेळगाव च्या मोर्चाला वाढता प्रतिसाद पाहता लाखो लोक मोर्चात जमण्याची शक्यता आहे . बेळगाव शहर आणि परिसरातील लाखो लोक मोर्चा सहभागी होतील या शिवाय शहराच्या चारी बाजूनी बाहेरून मोर्चात सामील होणाऱ्यांची संख्या अधिक आहे त्यामुळे कोणत्या पद्धतीन याच नियोजन झाल पाहिजे याकडे देखील लक्ष देण गरजेचे आहे .
परगावाहून येणाऱ्या लोकांची अल्पोपहार आणि बाथ रूम ची सोय या शिवाय गाड्या पार्किंग स्थळ नेमणे, नकाशा काढून सगळ्या साठी मार्गदर्शक सूची तयार करणे, पोलिसांशी चर्चा करून कश्या पद्धतीने ट्राफिक नियंत्रण बाहेर गावाहून येणाऱ्यांची सोय याकडे लक्ष दिल गेल पाहिजेत . या सगळ्या गोष्टी करत असताना हजारोच्या संख्येने स्वयं सेवक नेमणे आणि प्रत्येकाला जबाबदरी देऊन काम करून घेण गरजेच आहे . या अगोदर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक लढे झाले मोर्चे झाले यात नियोजनाचा अभाव होता मात्र मराठी क्रांती मोर्चा बेळगाव शहरातील एक ऐतिहासिक मोर्चा होणार असल्याने नियोजन करणाऱ्या तज्ञा कडून मार्गदर्शन घेऊन या सगळ्या गोष्ठी करायला हव्यात. या सगळ्या गोष्टी असताना आयोजकानी स्वय सेवकांची संख्या वाढवून जोराने कामाला लागणे गरजेचे आहे .
मोर्चा संयोजक प्रकाश मरगाळे यांना एकीकरण समिती समिती मेळावे अन्दोलनाच् नियोजन केल्याचा अनुभव आहे एका हाती त्यांनी अनेक मोर्चे मेळावे पण्डाल अस नियोजन केल आहे मात्र इतक्या मोठ्या मोर्चा नियोजन अभाव आहे यासाठी वेगळ्या तज्ञ लोकाच महाराष्ट्रात मोर्चा केलेल्यांच् मार्गदर्शन घेण जरुरी आहे . मोर्चा संयोजक प्रकाश मरगाळे यांनी बेळगाव लाईव्ह शी बोलताना सांगितले की लवकरच आम्ही शहरातील लॉज ना एक पत्र देणार असुन त्या लॉज समोर मोर्चा दिवशी सकल मराठा हा फलक लावतील आणि त्या लॉज मधून पर गावाहुँन आलेल्यांची टॉयलेट सुविधा होईल खानापुर भागातून आलेल्या अल्पोपहाराची उद्यमबाग कारखान दार उचलनार आहेत तसच अनेक संघटना आणि समाज वेग वेगळ्या भागात स्टॉल लावणार आहेत ही सगळी काम रविवार च्या आत नमून देणार आहोत कोल्हापुर आणि सातारा मोर्चा आयोजकांशी सतत संपर्कात असुन त्यांच्याशी सल्ला घेत आहोत एकूण हा मोर्चा शांततेत पार करायचा आहे.