बेळगाव दि २८: बेळगाव नगरीचा महापौर कोण बनणार याकडे कर्नाटक महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच लक्ष लागून राहील आहे त्यामुळे उद्या बुधवार १ मार्च रोजी होणाऱ्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे .
उद्या सकाळी महा पालिकेत सभागृहात निवडणूक प्रक्रियेस सुरुवात होणार आहे . महापौर पद मागास वर्ग अ महिला तर सामान्य गटाला उपमहापौर मिळणार आहे.सकाळी ११ वाजता उम्मेद्वारी अर्ज भरण्यात येणार असून दुपारी एक वाजता सभागृहात बैठक सुरु होणार आहे या नंतर अर्ज छानणी अर्ज माघारी मग निवडणूक घेण्यात येणार आहे. प्रभारी प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकरी एन जयराम यांच्या अध्यक्षतेखाली सदर महापालिका निवडणूक होणार आहे .
एकूण ५८ नगरसेवकांच्या महापालिकेत मराठी भाषिक गटाचे ३२ नगरसेवक आहेत तर कन्नड उर्दू गटाची संख्या २६ आहे. यातील एका नगरसेवकास मतदानाचा अधिकार नाही त्यामुळे कन्नड उर्दू गटाची संख्या २५ होते . या निवडणुकीत आमदार सतीश जारकीहोळी ,खासदार सुरेश अंगडी ,बेळगाव उत्तराचे आमदार फिरोज सेठ ,दक्षिणचे आमदार संभाजी पाटील आणि बेळगाव ग्रामीणचे आमदार संजय पाटील यानाही महापौर निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे. बेळगाव महापालीकेच्या इतिहासात आता पर्यन्त २६ महापौर पैकी २२ वेळा मराठी तर केवळ ४ वेळाच् कन्नड़ भाषिक महापौर झाला आहें त्यामुळे २७ वा महापौर कोण होणार याकडे सर्वांच लक्ष लागल आहे .
मराठी गटात चुरस
२३ नगरसेवक आणि ९ नगरसेवक अश्या दोन गटात विभागल्या गेलेल्या मराठी नगरसेवकात महापौर बनण्यासाठी चुरस लागली आहे . आमदार संभाजी पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जरी संभ्रमाच वातावरण असल तरी कोणत्याही स्थितीत मराठी भाषिक महापौर करणार असल्याच ठाम मत मांडलं होत. त्यामुळे जरी हे नगर सेवक दोन गटात विभागले गेले असले तरी मराठीच महापौर बनणार असल्याच चित्र आहे . महापौर पदासाठी नगर सेविका मीनाक्षी चिगरे, मधुश्री पुजारी ,संज्योत बांदेकर यांची नाव आघाडीवर आहेत