बेळगाव दि २७ : एकीकडे ३२ मराठी भाषिक नगरसेवकात पडलेल्या फुटीने समेट होण्यास विलंब होता असताना राज्य सरकारने कन्नड महापौर करण्यासाठी विशेष प्रतिनिधी पाठवावा अशी मागणी कन्नड संघटनेन चनम्मा चौकात आंदोलन करून केली आहे .
बेळगावात काही प्रमाणात उद्योजक, युवक कार्यकर्ते, माजी नगरसेवक मराठी नगरसेवकात एकीसाठी प्रयत्न करत आहेत तरी देखील मराठी नगरसेवकातून समेट होण्यास विलंब होत आहे अस असतानाया फुटीचा याचा नेमका फायदा घेण्याचा प्रयत्न कन्नड आणि उर्दू गटाने चालविला आहे. कन्नड रक्षण वेदिका या संघटनेने कर्नाटक सरकार ने या महापौर निवडणुकीसाठी विशेष प्रतिनिधी पाठवावा आणि कन्नड महापौर करावा अशी मागणी केली आहे त्यामुळे या महापौर निवडणुकीत हाय होल्टेज ड्रामा पहायावास मिळणार आहे.