बेळगाव दि १३ : भारतीय रेल्वे लवकरच कर्नाटका साठी तीन नवन हमसफर गाड्या सुरु करणार आहात . या तिन्ही गाड्यात जी पी एस सिस्टम सह खास सुविधा देण्यात आल्या आहेत . या तिन्ही गाड्यांपैकी तिरुचीपल्ली ते श्री गंगानगर(राजस्थान) गाडी बेळगाव हून धावणार आहे .
या हमसफर गाडीत प्रत्येक बुगीत एल इ डी बसविली असून धुम्रपान आणि आग रोखण्यासाठी सेन्सर देखील बसविलेली आहेत . बायो प्रसाधन गृह आणि चहा कॉफी देण्यासाठी वेंडिंग मशीन आधुनिक पद्धतीची कचरा कुंड या हमसफर गाड्यांची वैशिठ्ये आहेत . श्री गंगानगर(राजस्थान ते तीरुचीपल्ली १४७१५ असा क्रमांक असून बेळगाव ला दर बुधवारी सायंकाळी ५ वाजता तर तीरुचीपल्ली ते श्री गंगानगर गाडी चा क्रमाक १४७१५ असा असून शुक्रवारी रात्री १० वाजता बेळगाव ला येणार आहे .